प्रफुल गुडधे नवे जिल्हाध्यक्ष? ग्रामीण काँग्रेसमध्ये असंतोष

Congress
Congressesakal

नागपूर : शहर काँग्रेस अध्यक्षांचा वाद मिटता मिटत नसताना या स्पर्धेत सर्वाधिक आघाडीवर असलेले ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे (Praful Guddhe) यांना ग्रामीणचे अध्यक्ष करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे ग्रामीणमधील इच्छुकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ‘शहराचे पार्सल आमच्यावर का थोपवता’ असा सवाल ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित करीत आहेत.

Congress
बस व ट्रकचा भीषण अपघात; एक जागीच ठार, २५ जखमी

अभ्यासू, सोज्वळ व्यक्तिमत्त्वाचा नेता म्हणून गुडधे यांना ओळखले जाते. आपल्या युक्तिवादाने महापालिकेच्या अनेक सभा त्यांनी गाजविल्या आहेत. नेमक्या चुकीवर बोट ठेवून प्रशासनाला निर्णय बदलवण्यास त्यांनी अनेकदा बाध्य केले आहे. मात्र, विद्यमान शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना राजकीय आखाड्यात ते कधीच पराभूत करू शकले नाहीत. काँग्रेसचे अनेक प्रदेशाध्यक्ष बदलले, शहरातील नेते बदलले मात्र गुडधे यांच्या वाट्‍याला अपयशच आहे. महापालिकेत सर्वाधिक ज्येष्ठ नगरसेवक असतानाही तसेच क्षमता असतानाही काँग्रेसचे गटनेतेही त्यांना आजवर होता आले नाही. माजी आमदार अनिल सोले महापौर असताना त्यांच्या वाटेला विरोधीपक्षनेते पद आले होते. मात्र ते औटघटकेचेच ठरले.

देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना तसेच मुख्यमंत्र्यांचे दावेदार असताना त्यांच्या विरोधात कोणीच लढण्यास तयार नव्हते. तेव्हा दक्षिण-पश्चिम नागपूरमधून गुडधे यांनी निवडणूक लढून आपली राजकीय उंची वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही स्थानिक राजकारणात त्यांना फारसा राजकीय फायदा झाला नाही. दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, सुनील केदार यांच्याशी जवळीक असताना आणि सर्वांनी प्रयत्न केले असतानाही त्यांना अपेक्षित पद कधीच मिळाले नाही. आता चतुर्वेदी सक्रिय राजकारणात राहिले नाही. केदार आणि राऊत यांच्या भांडणात त्यांचे सँडविज होत आहे. विकास ठाकरे समर्थक त्यांना कधीच स्वीकारणार नसल्याने केदारांनी त्यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष करण्याचा डाव टाकला आहे.

हिंगण्यासाठी केले जात आहे सज्ज -

गुडधे यांनी यापूर्वी एकदा हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली होती. सर्वेसुद्धा करून घेतला होता. मात्र त्यानंतर हिंगण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा राष्ट्रवादीचे रमेश बंग यांची हिंगण्यावरह जबरदस्त पकड होती. भाजपचे विजय घोडमारे यांनी त्यांचे वर्चस्व संपवले. त्यानंतर भाजपने समीर मेघे यांना उमेदवारी दिली. ते सलग दोनदा निवडून आहेत. गुडधे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्त उमेदवार केल्यास मेघे यांचा पराभव केला जाऊ शकतो असा राजकीय कयास वर्तविला जात आहे. त्यामुळे गुडधे यांना जिल्हाध्यक्ष करून तयारी त्यांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांचा यास विरोध आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचाही यास नकार असल्याचा दावा ग्रामीणचे पदाधिकारी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com