चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर सध्या फरार आहे. मात्र, पाच दिवसांपूर्वी तो चंद्रपुरातील पोलिस मुख्यालयासमोरील एका हॅाटेलमध्ये वास्तव्याला होता. त्याला पोलिस दलातील एक अधिकारीही भेटून गेल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘चिल्लर’ कोरटकरचा पाऊणचार नेमका कुणी केला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.