Monsoon Update : नागपूर शहरात पुन्हा मॉन्सूनपूर्व पाऊस; दिवसभर उकाडा, सायंकाळी दिलासा, आजही अलर्ट
Nagpur Rain : नागपुरात दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने विदर्भात पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
नागपूर : बुधवारी अचानक चोरपावलांनी विदर्भात दाखल झालेल्या मॉन्सूनचा दोन दिवसांपासून उपराजधानीतही प्रभाव दिसून येत आहे. शहरात लागोपाठ दुसऱ्याही दिवशी दमदार मॉन्सूनपूर्व सरी बरसल्या.