
नागपूर : सहा महिन्यानंतर तूरडाळीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ १७० रुपये किलोपर्यंत तर मूगडाळ आणि इतर डाळीही शंभरीपार गेल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब झाली होती. आता मात्र, तूरडाळीचे दर घसरले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर २० रुपयांनी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.