

Land survey in the state will now be completed in just 15 days
Sakal
राज्यातील लाखो शेतकऱ्यांची आणि जमीनधारकांची वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारी जमीन मोजणी आता अवघ्या १५ दिवसांत मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्यातील जमीन मोजणीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तब्बल ५ हजार परवानाधारक खासगी भूकरमापकांची (लायसन्स सर्वेअर) तातडीने नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.