Private Secretary : ‘खासगी सचिव’पदासाठी मंत्र्यांकडे लागल्या रांगा....एकेका मंत्र्याला २० ते २५ जणांचे अर्ज; ‘रेडीमेड टीम’ घेण्याची ऑफर
Ready made team : नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्री पदासाठी खासगी सचिवांचे अर्ज येत आहेत. अनेक इच्छुकांनी 'रेडीमेड टीम' देण्याची ऑफर मंत्र्यांना दिली आहे.
नागपूर : नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर ‘खासगी सचिवां’नी पुन्हा एकदा नव्या मंत्र्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यामुळे नागपूर येथील विधानभवन परिसरात अशा अधिकाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. एकेका मंत्र्यांकडे २० ते २५ अर्ज आले आहेत.