Fighting Malaria: डासांवर नियंत्रण ठेवून आरोग्याचे रक्षण; जनजागृतीद्वारे हिवतापमुक्ततेकडे पाऊल
Malaria-free India mission through awareness drives: हिवतापासारख्या जीवघेण्या कीटकजन्य आजाराविषयी समाजात व्यापक जनजागृती होण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी ‘जून’ महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.
हिवतापाचा प्रसार ॲनाफेलीस डासांच्या मादीद्वारे होतो. मादी डासांकडून हिवतापाचा प्लाझमोडीयम जंतू रक्तात मिसळून संसर्ग होतो. फॅलसिफेरम व व्हायवॅक्स हे दोन प्रमुख प्रकार असून, फॅलसिफेरम प्रकार वेळेत निदान न झाल्यास मेंदूवरील गंभीर परिणाम करू शकतो. यामुळे नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहनही यावेळी डॉ. गहलोत यांनी केले.
हिवतापाची प्रमुख लक्षणे
थंडी वाजून ताप येणे, एक दिवस आड ताप, घाम येणे, डोकेदुखी, उलट्या ही लक्षणे असून प्रसंगी गंभीर स्वरूपात झटके, बेशुद्धावस्था आणि मृत्यूही होऊ शकतो.
रोगनिदान आणि उपचार
शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत रक्त तपासणी व औषधोपचार उपलब्ध आहेत. आरडीके चाचणीद्वारे तत्काळ निदान केले जाते. ताप आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी आवश्यक आहे.
डास निर्मिती रोखण्यासाठी उपाय
घरातील पाण्याची भांडी झाकणे, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे, नारळ करवंट्या, टायर, रिकाम्या बाटल्या नष्ट करणे, शोषखड्ड्यांचा वापर, अळीनाशक टाकणे व गप्पी मासे सोडणे हे महत्त्वाचे उपाय आहेत. मच्छरदाणीचा वापर, अंगभर कपडे, खिडक्यांना जाळी बसवणे, घरात कीटकनाशक फवारणी करणे इत्यादी उपाय प्रभावी ठरतात.
कर्मचारी व आशा स्वयंसेवकांना प्रशिक्षण, सर्वेक्षण व पर्यवेक्षण, अळीनाशकांचा पुरवठा, संशयित रुग्णांसाठी चाचण्या, औषध साठा, तसेच उद्रेकग्रस्त भागात धुरफवारणीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. हिवतापासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या पातळीवर दक्षता घेणे आवश्यक आहे.
- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.