तिसऱ्या दिवशीही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप कायम, डॉक्टरांचेच होणार नुकसान

doctors
doctorse sakal

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) (government medical college and hospital nagpur) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) (indira gandhi government medical college and hospital nagpur) कोविड हॉस्पिटल (covid hospital) तयार झाल्यामुळे डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप (trainee doctors protest)पुकारला. यामुळे मनुष्यबळाची समस्या प्रचंड वाढली आहे. तिसऱ्या दिवशीही या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप कायम आहे. (protest of trainee doctors continue on third day in nagpur)

doctors
कुटुंबातील आठही जणांना एकाचवेळी कोरोनाची लागण, आई ऑक्सिजनवरही असूनही केली मात

संप अधिक वाढत असल्यामुळे चिघळण्याची शक्यता वाढली आहे. विशेष असे की, यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची डिग्रीही लांबणीवर पडणार आहे. ही वार्ता आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांमध्ये पोहचल्यानंतर मात्र आंदोलनात फाटाफूट होण्याचीही शक्यता वैद्यकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. मात्र, सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टर आंदोलन संघटितरीत्या असल्याचे सांगत आहेत. एमबीबीएसचा अभ्यासक्रम झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना १ वर्षे म्हणजेच ३६५ दिवसापर्यंत पूर्णपणे प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून सेवा द्यावी लागते. तसा नियमच आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून पदवी मिळते. दरम्यान, या आंदोलनामुळे आता संपाच्या कालावधीएवढा अतिरिक्त कालावधी प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून मेडिकल, मेयो रुग्णालयात सेवा द्यावी लागणार आहे. त्यामुळे आंदोलन वाढल्यास याच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे नुकसान होणार आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आमच्या मागण्यांचा विषय पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यापुढे ठेवण्यात आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे आम्हाला सांगण्यात आले. राज्यभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मानधन एकसारखे असावे. आमच्या मागण्यांचा विचार व्हावा.
-डॉ. शुभम नागरे, प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर (इंन्टर्न)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com