Amravati Morcha : अमरावतीत बंदला हिंसक वळण; यशोमती ठाकूर म्हणाल्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yashomati thakur

अमरावतीत बंदला हिंसक वळण; यशोमती ठाकूर म्हणाल्या...

नागपूर : त्रिपुरा येथील मशीद तोडफोडीच्या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात काही समाजकंटकांनी दगडफेक आणि तोडफोड केली होती. शनिवारी पुन्हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. पोलिसांनी लाठीमार केला. यावर भाष्य करताना गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही याचा निषेध करतो, असे महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

नवरात्रीमध्ये बांगलादेशात दुर्गा मंडपाची मुस्लिम जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद त्रिपुरात उमटले. त्रिपुरातील घटनेचे पडसाद देश आणि महाराष्ट्रात उमटल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये काढलेल्या मोर्चातील जमावाने दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली होती. पोलिस आयुक्तांनी शांतता बाळगून घरी जाण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांना केले होते.

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

शनिवारी बंद देखील घोषित करण्यात आला होता. परंतु, बंद दरम्यान पुन्हा हिंसा उफाळून आली. जमावाने राजकमल चौकात दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून निदर्शने केली.

शहरातील नमुना परिसर, जवाहर गेट, गांधी चौक भागामध्ये फिरून किरकोळ स्वरूपात फुटपाथवर असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न जमावाने केला. यावेळी त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. आंदोलनाच्या निमित्ताने शहराच्या सर्वच चौकांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा: रश्मी देसाईचा ट्यूब ब्रामध्ये बोल्ड फोटोशूट

या मोर्चाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच गालबोट लावले जात आहे. मोर्चातून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. यातून एकता खंडीत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाले. या घटनेचा आम्ही निषेध करीत असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

loading image
go to top