
नागपुरात दोन गटांमध्ये जोरदार हिंसाचार उसळला आणि या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजवली. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या या वादाने हिंसक वळण घेतले. दंगलखोरांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली, तर क्रेन आणि जेसीबीसारख्या यंत्रांनाही आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पोलिसांवरही हल्ला झाला, ज्यामुळे अनेक पोलीस जखमी झाले. मात्र, आता या दंगलखोरांची खैर नाही, कारण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. चला, या कायद्याच्या तरतुदी आणि कारवाईचा सविस्तर आढावा घेऊया.