Pushpa Stype Ganja Smugglingsakal
नागपूर
Ganja Seized : पुष्पा स्टाईल शहरात गांजाची तस्करी; भंडारा महामार्गावर २६ लाखाचा गांजा जप्त
भंडारा-हैदराबाद महामार्गावर पुष्पा स्टाईल ट्रकमध्ये वेगळा पत्रा टाकून त्यामध्ये गांजा लपविल्याचे आढळून आले.
नागपूर - पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा-हैदराबाद महामार्गावर ट्रकमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना २६ लाख ७१ हजार एवढ्या किमतीच्या १०६ किलो ८५० ग्रॅम गांजासह गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे, दोघांनीही पुष्पा स्टाईल ट्रकमध्ये वेगळा पत्रा टाकून त्यामध्ये गांजा लपविल्याचे आढळून आले.