
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधी यांना कॉंग्रेसचेच नेते गांभीर्याने घेत नाहीत, तुम्ही कशाला गांभीर्याने घेता असा टोला गुरुवारी लगावला. निमित्त होते, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ११ वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेचे.