Nagpur : अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर छापेमारी; आयुक्तांचे ‘मिशन सफाया’

आयुक्तांच्या या धक्कातंत्र कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.
Nagpur
NagpurSakal
Updated on

नागपूर : दिवाळी आली की घराची साफसफाई केली जाते. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारांची साफसफाई करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर मंगळवारी रात्री छापेमारी करण्यात आली. या अभियानात ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून ३१ गुन्हेगारांकडे धारदार आणि प्राणघातक शस्त्रे आढळली. पोलिस आयुक्तांच्या या धक्कातंत्र कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहरात गुन्हे शाखेची पथके आणि पोलिस ठाण्यातील डीबी पथकांकडून गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईस सुरवात करण्यात आली आहे. सोमवारी क्रिकेट सट्टेबाजांविरूद्ध अभियान राबविण्यात येऊन शहरातील १८ बुकींना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच काही बुकींच्या घरावर छापे घालण्यात आले होते.

Nagpur
ड्रग्ज तस्करांवर पोलिसांचे छापे; ६६ जणांना अटक

मंगळवारी ड्रग्स आणि गांजा विक्री-खरेदी करणाऱ्यांविरुद्ध अभियान राबविण्यात आले. पोलिसांनी ६६ अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. पोलिसांनी शहरभरात शस्त्र बाळगाणाऱ्यांविरूद्ध छापेमारी करून ३१ गुन्हेगारांना अटक केली. आरोपींकडून ३१ धारदार व प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर एकाच ठिकाणी पाच जण शस्त्रांसह लपून बसले होते. त्या टोळीवर छापा घालून तिघांना अटक केली तर दोघे पळून गेले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही मोहीम पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्‍वती दोर्जे आणि गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.

Nagpur
व्याघ्र गणना डिसेंबर महिन्यापासून; २१ राज्यात राबविण्यात येणार प्रक्रिया

चाकूबाजांमध्ये अंबाझरी ‘हॉट’

अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक पाच ठिकाणी पोलिसांनी छापे घालून पाच जणांना चाकू-तलवार आणि अन्य शस्त्रांसह अटक केली. तहसील, कामठी आणि एमआयडीसी परिसरात तीन-तीन गुन्हेगारांना शस्त्रांसह अटक करण्यात आली. गस्त प्रणाली व्यवस्थित नसल्यामुळे अनेक शस्त्रबाज खुलेआम फिरत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com