
नागपूर: आरक्षित, अनारक्षित व प्लॅटफॉर्म तिकीट, रेल्वेचे प्रत्यक्ष लोकेशन, पीएनआर चौकशी, रेल मदत, जेवणाचे बुकिंग एवढेच नाही तर मालवाहतुकीशी संबंधित चौकशी अशा वेगवेगळ्या ॲपमध्ये मिळणाऱ्या सुविधा आता एकाच ॲपमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. मध्यरेल्वेने यासाठी ‘रेल वन’ हे ॲप विकसित केले आहे. वेगवेगळे ॲप वापरण्यापेक्षा हा एकच ॲप प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.