दक्षिण भारतातील पावसाने संत्र्याचे भाव कोसळले | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण भारतातील पावसाने संत्र्याचे भाव कोसळले

नागपूर : दक्षिण भारतातील पावसाने संत्र्याचे भाव कोसळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दक्षिण भारतात सतत पाऊस सुरु असल्याने आंबिया बारच्या संत्र्यांची मागणीत मोठी घट झाली. याचा परिणाम म्हणजे यावर्षी संत्र्याच्या भावात विक्रमी घट झाली. कळमना बाजारात ठोक दरात संत्री आणि मोसंबी १५ ते २० रूपये किलोने विकल्या जात आहे. बाजारात संत्र्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने विक्रेत्यांना उधारीत माल देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. दक्षिणेत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने विदर्भातील संत्री आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

दसऱ्यापूर्वी आंबिया बारच्या संत्र्यांची आवक कळमना बाजार समितीत सुरु झाली. प्रारंभी दर्जेदार संत्र्यांला चांगला भाव मिळत होता. अचानकच मध्यप्रदेशातील थंडी गायब झाली आणि दक्षिण भारतातही पाऊस कोसळत आहे. त्यामुळे त्या भागातील व्यापाऱ्यांकडून संत्र्यांची मागणी ७० टक्क्यांनी कमी झालेली आहे. परिणामी, स्थानिक बाजारात संत्र्यांची मागणी पेक्षा आवक अधिक असल्याने भाव गडगडले आहे. पूर्वी किरकोळ बाजारात मध्यम आकाराची संत्री ६० रुपये, तर चांगल्या संत्र्याला १०० रुपये डझन भाव होता. त्यातही घसरण झाली असून ४० ते ६० रुपयावर आला आहे. कळमन्यात संत्र्यांची आवक अधिक आहे. आंबिया संत्र्याला मागणी कमी झालेली असताना त्यावर नवीनच व्हायरस आल्याने दोनच दिवसात संत्री खराब होऊ लागली आहे.

दक्षिण भारतातील पावसाने संत्र्याचे भाव कोसळले त्यामुळे त्याची साठवणूक क्षमताही संपल्याने व्यापारीही उधारीमध्ये विक्रेत्यांना संत्री घेऊन जाण्यासाठी साकडे घालत असल्याचे चित्र बाजारात आहे. कळमना फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, कळमन्यात कळमेश्वर, मोहपा, काटोल, नरखेड, कोंढाळी या भागातून संत्र्यांची आवक होते. यावर्षी अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पाच लाख टन अपेक्षित उत्पादनापेक्षा जवळपास तीन लाख टन होण्याची शक्यता आहे.

३० टक्के संत्री जातात वाया

मोठ्या संत्र्यांना अर्थात ५० एमएमपेक्षा जास्त आकाराच्या संत्र्यांना चांगला दर मिळतो. त्यापेक्षा कमी आकाराच्या संत्र्यांना व्यापारी विचारतही नाहीत. अर्थात एकूण उत्पादनाच्या ३० टक्के संत्री जी आकाराने लहान असतात ती वाया जातात किंवा मातीबोल भावाने विकावी लागतात,असे उत्पादकांचे म्हणने आहे.

हवामान बदलाचा फटका

हवामान बदलाचा आणि तांत्रिक अज्ञानाचा फटका शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्टीमुळे जमिनीत पाण्याचा निचरा कमी झाला, शिवाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पिकाला फटका बसला.

लागवडीखालील nक्षेत्र (हेक्टरमध्ये)

अमरावती ८० हजार , नागपूर २५

loading image
go to top