

Ancient Lake Repair Inscription Unearthed in Sakhar, Rajapur Dating Back to 1886
sakal
Ancient Lake Repair Inscription Unearthed : राजापूर तालुक्यातील साखर-चव्हाणवाडी येथे ग्रामदैवत श्री माणेश्वर मंदिर परिसरात सापडलेल्या शिलालेखातून १८८६मध्ये लोकल फंड व पुण्यातील वकील सदाशिव पटवर्धन यांच्या सहकायनि तलावाचा जीर्णोद्धार करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण ऐतिहासिक नोंद समोर आली आहे. हा शिलालेख केवळ जलव्यवस्थापनाच्या परंपरेचेच नव्हे; तर त्या काळातील स्थानिक स्वराज्य व्यवस्था व सार्वजनिक निधी उभारणीच्या पद्धतीचेही द्योतक ठरत आहे.