Ram navami 2023: संत्रानगरीत आज रामजन्मोत्सवाची धूम

पोद्दारेश्‍वर, पश्‍चिम नागपूर शोभायात्रा आकर्षणाचे केंद्र
Shri Ram Navami
Shri Ram NavamiSakal
Updated on: 

नागपूर : रामनवमीच्या निमित्ताने शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच राममंदिरांमध्येही विविध कार्यक्रमांचे नियोजन असल्याने गुरुवारी संपूर्ण शहर राममय होणार आहे.

गेल्या ५७ वर्षांपासून श्री पोद्दारेश्‍वर राममंदिर येथून तर पश्‍चिम नागपूर नागरिक मंडळाकडूनही भव्य शोभायात्रा काढली जात आहे. यावर्षी शोभायात्रेतून कोल्हापूरची महालक्ष्मी, बागेश्वर धाम, आदासा गणपती, कोराडीची जगदंबा, धापेवाड्याचे विठ्ठल मंदिर, शेगावचे गजानन महाराज देवस्थान

Shri Ram Navami
Nagpur : ... अन्‌ आमच्या जीवनाचाच खेळखंडोबा झालाय, सायेब !

अशा एक-दोन नव्हे तर तब्बल शंभरावर चित्ररथांचे दर्शन गुरुवारी नागपूरकरांना होणार आहे. दुसऱ्या शोभायात्रेत ६० च्यावर चित्ररथ राहणार असून आकर्षक विविध लोकनृत्यांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीचे पुनीत पोद्दार यांनी दिली. विविध मार्गावर विविध भागात प्रवेशद्वार, चौकाचौकात विविध आकर्षक पौराणिक दृश्येही साकारण्यात येणार आहे.

विश्वगुरू भारतावर आधारित चित्ररथ वेधणार लक्ष

पश्चिम नागपूर नागरिक संघाच्यावतीने आयोजित शोभायात्रेत रामायणावर आणि विदर्भातील विविध तीर्थस्थळांवर आधारित ३० पेक्षा अधिक चित्ररथांसह लोकनृत्य आणि विश्वगुरू भारतावर आधारित भारतमातेचा चित्ररथ राहील.हा चित्ररथ, प्रभू रामचंद्राने रावणावर विजय प्राप्त केल्यावर पुष्पक विमानातून अयोध्येत आगमनाचा चित्ररथ आकर्षण ठरणार आहे. शिवाय अनेक मंदिरांमध्ये रामनवमीनिमित्त कार्यक्रमाने शहरातील वातावरण भक्तीमय होणार आहे.

Shri Ram Navami
Nagpur : सारथी, महाज्योतीला जमले ते बार्टीला का नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur traffic police extortion case latest news
Nagpur Graduate Constituency Election
Maharashtra Drought Review Meeting Cancelled Agriculture Minister Meetings In Pune And Nagpur Divisions Postponed
Nagpur Vacant Plots
Marathi News Esakal
www.esakal.com