अन् खासदार तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ः युवकांना शिकवले डावपेच
Ramdas Tadas on wrestling mat Tricks taught to wrestler wardha
Ramdas Tadas on wrestling mat Tricks taught to wrestler wardhasakal

वर्धा : राजकीय आखाड्यात जिल्ह्याचा दिल्लीत झेंडा रोवणाऱ्या खासदार रामदास तडस यांनी बऱ्याच दिवसानंतर आखाड्यात पहेलवानांसोबत डावपेच खेळले. यात त्यांनी नव्या कुस्तीगिरांना ‘ओल्ड इज गोल्ड’ असल्याचे दाखवून दिले. रिंगणात पहेलवानांसोबत केलेल्या डावपेचाने यंदा पुन्हा विदर्भ केसरी वर्ध्याला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खासदार क्रीडा महोत्सवात येत्या महिन्यात विदर्भ केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाची पाहणी करण्याकरिता संसदेची चमू आली असता त्यांनी पहेवालांनांना अनेक डावपेच शिकविले. देवळीच्या मैदानावर कुस्तीगिरांचा सराव सुरू आहे. यात खासदार रामदास तडस आपल्या अनुभाचे शिक्षण या नव्या कुस्तागिरांना देत असल्याचे अनेकवार दिसले आहे. त्यांच्याकडून कुस्तीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येईल असे अनेकांकडून बोलले जात आहे.

राजकारणाच्या आखाड्यात असलेले खासदार रामदास तडस रोज पहाटे साडेचार ते साडेपाच पहाटे नित्य व्यायाम करतात. व्यायाम झाल्यावर ते येथे सराव करीत असलेल्या नव्या कुस्तीगिरांना ते प्रशिक्षण देतात. यात एखादा कुस्तीगीर तयार होइल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

चार वेळा विदर्भ केसरी

जिल्ह्यात पहेलवान अशी ओळख असलेल्या खासदार रामदास तडस यांनी अनेकांना कुस्तीत चित केले आहे. विरोधकाला चित करण्याची सवय यातूनच त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी राजकीय आखड्यात यातूनच अनेकांना पछाडले आहे. राजकारणात येण्यापूर्वी पूर्ण वेळ कुस्तीत असताना त्यांनी १९७४, १९७६, १९७८ आणि १९८० या चार वर्षांत त्यांनी विदर्भ केसरीचा मान मिळविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com