Unseasonal Rain: दुष्काळाच्या झळांनंतर अवकाळीचा घाला ,रामटेकचा बळीराजा दुहेरी संकटात; ढगाळ वातावरणामुळे धास्ती वाढली

Unseasonal Rain: दुष्काळाचा सामना करून वाचविलेल्या धान पिकाच्या कापणीदरम्यान रामटेक तालुक्यात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली.
Farmers in Ramtek taluka face uncertainty as unseasonal rain threatens paddy harvesting.

Farmers in Ramtek taluka face uncertainty as unseasonal rain threatens paddy harvesting.

esakal

Updated on: 

शितलवाडी : यंदा खरीप हंगामात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता अवकाळी पावसाचे नवे संकट उभे ठाकले आहे. मोठ्या कष्टाने वाचविलेल्या धान पिकाची कापणी सुरू असतानाच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

Loading content, please wait...