
रामटेक : मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले मधुकरराव किंमतकर हे १९८१ मध्ये तत्कालीन सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्याला आज ४५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. निदान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये तरी विद्यमान आमदाराला मंत्रिपद मिळायला हवे, अशी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.