रेल्वेतून रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन तस्करीची शक्यता; RPF करतेय पार्सलची 'रॅण्डम' तपासणी

रेल्वेतून रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन तस्करीची शक्यता; RPF करतेय पार्सलची 'रॅण्डम' तपासणी

नागपूर : कोरोना रुग्णांचा (Corona virus) ग्राफ खाली येत असला तरी रेमडेसिव्हीर इंग्जेक्शन (Remdesivir Injection) व ऑक्सिजनच्या काळाबाजार (Oxygen Cylinder) सुरूच आहे. या साहित्याची रेल्वेतून तस्करीची शक्यता असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने सक्रीयता (Railway police force) वाढविली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरही (Nagpur Railway station) पार्सलची रॅण्डम तपासणी करण्यासह बुकींगसंदर्भात आवश्यक खातरजमा केली जात आहे. (Random parcel checking by RPF on Nagpur Railway station)

रेल्वेतून रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन तस्करीची शक्यता; RPF करतेय पार्सलची 'रॅण्डम' तपासणी
कुलरमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या काय आहे डॉक्टरांचं मत

अलीकडेच मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रेल्वेतील पार्सलमधून बिहारच्या कटिहार येथे २२५ ऑक्सिजन सिलेंडर पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे हा प्रकार उगडीस आल्यावर बुकिंग करणारे किंवा ते घेण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. यामुळे तस्करीचा संशय बळावला आहे. तस्करीची शंका असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने पूर्वीच सतर्कता वाढविली आहे. नागपूर स्टेशनवरही बुकींग केल्या जाणाऱ्या व बाहेरून येणाऱ्या पार्सलची तपासणी केली जात आहे. साहित्य पाठविणारे व ते घेण्यासाठी येणाऱ्यांची खातरजमा केली जात आहे. रॅण्डम पद्धतीने पार्सल उघडून बघण्यात येत आहे.

कोरोनाने हाहाकार उडवून दिला असतानाच उपराजधानीने रेमडेसिव्हिर इंग्जेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडाही अनुभवला. एका रेमडेसिव्हीरसाठी तब्बल ३० हजारांपर्यत मोजावे लागले. ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठीही जंगजंग पछाडावी लागली. नागपूरची स्थिती सावरत असली तरी आता देशाच्या विविध भागात संसर्गाने पाय पसरविले आहे. अशात रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची तस्करी केली जाऊ शकते. सर्वात सोयीचा पर्याय म्हणून तस्करीसाठी रेल्वेचा उपयोग होण्याची शक्यता असल्याने आवश्यक काळजी घेतली जात आहे.

महिनाभरापासून तपासणी

सुमारे महिनाभरापूर्वी रेल्वेत आग लागण्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या. या घटनांना आवर घालण्यासाठी पार्सललाच केंद्रित करण्यात आले. वाणिज्य विभाग व आरपीएफकडून संयुक्तरित्या पार्सलची आवश्यक खातरजमा करणे सुरू करण्यात आली. हीच मोहित तस्करीच्या शक्यतेने कायम ठेवण्यात आली आहे.

रेल्वेतून रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन तस्करीची शक्यता; RPF करतेय पार्सलची 'रॅण्डम' तपासणी
नागपूरकरांनो, कोरोनाचा प्रकोप ओसरतोय; मृत्यूचा आकडाही कमी
रेमडेसिव्हीर इंग्जेक्शन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या तस्करीची शक्यता असल्याने आरपीएफने पाळत वाढविली आहे. पार्सलची रॅण्डम तपासणी करीत आवश्यक खातरजमा केली जात आहे.
आशुतोष पाण्डेय वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, नागपूर.

(Random parcel checking by RPF on Nagpur Railway station)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com