रणजीत सफेलकरने घडवले आणखी एक हत्याकांड; पत्नीशी मैत्री ठेवल्यामुळे खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Safelkar is the mastermind of another murder Nagpur crime news

चक्क डॉन सफेलकरच्या बायकोशी मैत्री; अन् घडला थरारक हत्याकांड

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कुख्यात डॉन रणजीत सफेलकरच्या गॅंगमधील एका युवकाची नजर फिरली आणि त्याने चक्क सफेलकरच्या बायकोशी मैत्री केली. याबाबत माहिती मिळताच सफेलकरने युवकाला कारने चिरडून ठार करीत ‘गेम’ केला. विशाल पैसाडेली (२८, रा. कामठी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विशालच्या हत्याकांडाला आज १४ वर्षे झाले असून, उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, हे विशेष.

हेही वाचा: माहेरी आलेल्या मुलीवर काळाचा घाला; अपघातात वडिलांसह ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामठी येथील रहिवासी विशाल पैसाडेली हा रणजीत सफेलकर आणि कालू हाटेच्या गॅंगमध्ये काम करीत होता. तो नेहमी रणजीत सोबत राहत असल्यामुळे त्याला घरात केव्हाही प्रवेश होता. या दरम्यान रणजीत सफेलकरच्या पत्नीवर त्याची नजर पडली. विशालने तिच्याशी मैत्री केली. काही दिवसांनंतर दोघांची मैत्रीपूर्ण संबंध घट्ट झाले. दोघांच्या मैत्रीची कुणकुण रणजीतला लागली. त्यामुळे त्याने विशालचा गेम करण्याचे ठरविले.

असा केला ‘गेम’

विशाल आणि पत्नीच्या मैत्रीला संपविण्यासाठी विशालचा खून करण्याचा कट रचला. २३ मार्च २००७ रोजी कालूच्या माध्यमातून विशालला घरी बोलावले. तेथे दारू पाजल्यानंतर कामठी छावणीच्या वारेगाव पुलावर नेले. तेथे त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्याला रस्त्यावर झोपवून स्कॉर्पिओने चिरडले. त्यानंतर मृतदेहाला १० फूट खोल जागेत फेकून दिले. या प्रकरणात खापरखेडा पोलिस ठाण्यात काही पोलिस अधिकाऱ्यांना मॅनेज करीत अपघाताचा गुन्हा दाखल करून त्यात बनावट व्यक्तीला आरोपी वाहनचालक म्हणून अटक करण्यात आली होती.

हेही वाचा: ‘मैं फांसी लगाने जा रहा हू’; असा मित्राला फोन करून आत्महत्या

१४ वर्षांनंतर हत्याकांड उघड

रणजीत सफेलकरला मनीष श्रीवास हत्याकांडात गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात क्राईमच्या युनिट चारचे सहायक पोलिस निरीक्षक ओम सोनटक्के यांच्या पथकाने याचा तपास करून १४ वर्षांनंतर सत्य बाहेर काढले. यात सफेलकर टोळीने योजनाबद्ध पद्धतीने हा खून घडविल्याचा खुलासा झाला. हा तपास अहवाल ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना पाठविण्यात आला. खापरखेडाचे निरीक्षक भटकर यांनी सावनेर न्यायालयात हा अहवाल सादर केला. त्या आधारे न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची परवानगी दिली.

loading image
go to top