Rare Medical Case : पोटातील क्षयरोगामुळे आतड्यांमध्ये छिद्र; २४ वर्षीय तरुणीला जीवनदान
Tuberculosis Awareness : २४ वर्षीय तरुणीच्या पोटातील क्षयरोगामुळे लहान आतड्यांमध्ये छिद्रे पडली होती. वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्मीळ शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवला. ही वैद्यकीय कामगिरी जीव वाचवणारी ठरली असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.
नागपूर : क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होणारा एक जिवाणू संसर्ग आहे. तो प्रामुख्याने फुफ्फुसांवर, आतड्यांवर परिणाम करतो, परंतु तो मेंदू, पाठीचा कणा किंवा मूत्रपिंड यासारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरत असल्याचे दिसते.