

प्रवीण वानखेडे
नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे असंख्य पुतळे शहरात आहेत. परंतु, घोड्यावर स्वार होऊन शत्रूचा सर्वनाश करण्याच्या मुद्रेतील पुतळा क्वचीतच बघायला मिळेल. असाच महाराजांचा एक अश्वारुढ पुतळा शहरातील तोसुद्धा बहुमजली इमारतीच्या छतावर आहे. हा पुतळा जमीनीपासून ५०-६० फूट उंचीवर स्थित आहे. हे ठिकाण जरी शहराच्या वारसा स्थळांच्या यादीत नसले, तरी महाराजांचा हा पुतळा इतक्या उंचीवर कसा नेला असावा, याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात असते.