Maharashtra Wildlife : वर्धा-नागपूर जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात तिसऱ्यांदा दुर्मीळ ‘ल्युसिस्टिक’ अस्वलाचे पिल्लू आढळले आहे. वन्यजीव अभ्यासक संजय करकरे यांनी हे अनोखे दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले.
नागपूर : वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात तिसऱ्यांदा अस्वलाचे दुर्मीळ असे ‘ल्युसिस्टिक’ पिल्लू आढळून आले आहे. एक काळे तर एक ‘ल्युसिस्टिक’ पिल्लू चक्क आईच्या पाठीवर बसून बोर व्याघ्रप्रकल्पात भ्रमंती करताना दिसले.