Nagpur News : दुर्मीळ शस्त्रक्रिया करून हिमोफेलियाबाधित अजितला वाचविले

मेडिकलमध्ये सोळा वर्षीय अजित शेंडे याच्यावर हिमोफिलिया बी आजाराची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ajit shende
ajit shendesakal
Updated on

नागपूर - मेडिकलमध्ये सोळा वर्षीय अजित शेंडे याच्यावर हिमोफिलिया बी आजाराची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हिमोफिलियावर उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, ज्या रक्तघटकांच्या कमतरतेमुळे तो होतो, ते फॅक्टर म्हणजेच रक्तघटक इंजेक्शनद्वारे शरीरात टाकणे हाच एकमेव पर्याय आहे. अतिशय महागडे उपचार आहेत.

दानदात्यांच्या मदतीवरच उपचार होतात. या रुग्णांना थेट मुंबईला रेफर केले जाते. नऊ फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी भागातील सोळा वर्षीय अजित शेंडे याचा अपघात झाला. पायाला जखम झाली. तो सर्जरी विभागात दाखल झाला. जखमेतून सतत रक्तस्त्राव होत होता.

अजितला हिमोफेलिया बी हा अती दुर्मीळ आनुवंशिक रक्तासंबंधित आजार असल्याचे निदान झाले. एम्स येथील रक्तविकारतज्ज्ञ डॉ. विश्वदीप यांच्या सूचनेनुसार मेडिकलच्या डॉक्टरांच्या पथकाने अजितवर शस्त्रक्रिया केली.

डॉ. प्रवीण भिंगारे, डॉ. अनुप वाकोडकर, डॉ. प्रदीप शिवसारण, डॉ. पंकज टोंगसे, डॉ. महिमा अद्वैत्या, डॉ. रेवती पूल्लावर, डॉ. शिवलीला होसांगडी डॉ.सिद्धी छाजेड, डॉ. प्रणाली पटले, डॉ. युहेश कन्ना व तसेच पॅथॉलॉजिस्ट डॉ. शैलेंद्र जांभुळकर, डॉ. मंजिरी माकडे, डॉ. तृप्ती लाडे, डॉ. संदीप पोराटकर यांचे योगदान आहे.

एम्समधून मेडिकलमध्ये रेफर

मेडिकलला उपचाराला येण्यापूर्वी वर्धा येथील सेवाग्राम रूग्णालयात अजितने तीन दिवस उपचार घेतले. येथून एम्समध्ये रेफर केले. एम्स नागपूरमध्ये उपचारासाठी अजित पोचला. परंतु एम्समधून अजित शेंडे याला मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले.

कुटुंबीयाने रुग्णाला मेडिकल आणल्यानंतर विभागप्रमूख डॉ. ब्रिजेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रवीण भिंगारे यांच्या वैद्यकीय पथकाने दाखल करून घेतले. उपचार सुरू झाले. रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी उजवा पाय तातडीने कापून शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. ही शस्त्रक्रिया किचकट आणि गुंतागुंतीची होती. परंतु फॅक्टर ९ च्या कमतरतेमुळे शस्त्रक्रिया करणे धोक्याचे होते.

हिमोफिलियाबाधित अजितवर उपचारासाठी येथील डॉक्टरांनी सर्वोतपरी प्रयत्न केले. रुग्णाचा जीव वाचला, हे डॉक्टरांसाठी महत्वाचे असते. मेडिकल प्रशासनाने केलेल्या प्रयत्नाला यश आले. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी विशेष प्रयत्न केले.

- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल.

हिमोफिलिया दुर्मीळ आजार आहे. या आजारावरील उपचारासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आणि डागा रुग्णालयाचे डॉ. देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच मेडिकलच्या डॉक्टरांनी उत्तम उपचार केल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश मिळाले.

- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल

फॅक्टर ९ ची मिळाली मदत

अजितला हिमोफिलिया होता. यामुळे रक्तस्त्राव थांबविण्याकरिता फॅक्टर ९ हा महत्त्वाचा घटक महत्वाचा असतो. यासाठी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी तातडीने डागा हॉस्पिटलचे हिमोफिलिया प्रभारी डॉ. संजय देशमुख आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृती राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी फॅक्टर ९ या औषधाची जुळवाजुळव केली. एकूण ५० वाइल्स उपलब्ध करून दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com