Nagpur Factory Blast : राऊळगाव एसबीएल स्फोटातील मृतांचा आकडा २२ वर; मृत्युमुखी पडलेल्या महिला कामगारांची ओळख
Nagpur Accident: नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव SBL लिमिटेड कारखान्यात १ मार्चला स्फोट झाला. सध्या मृतांची संख्या २२ पोहोचली असून १४ जखमी महिला रुग्णालयात उपचाराधीन आहेत.
नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल लिमिटेड या दारूगोळा बनविणाऱ्या कारखान्यात १ मार्चला स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ मार्चपर्यंत २० पर्यंत पोहोचली होती.