
नागपूर : नविन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत एका फार्महाऊसवर सुरू असलेल्या रेव्हपार्टीवर गुन्हेशाखेच्या पथकांनी शनिवारी (ता.१०) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास छापा टाकला. दोन्ही पथकांनी चौघांना एमडीसह अटक करीत चार तरुणींची सुटका केली. या तरुणी मुंबईवरून बोलाविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.