रवी राणा म्हणाले, बाळासाहेब असताना शिवसेना होती; ही तर...

MLA Ravi Rana
MLA Ravi RanaMLA Ravi Rana

नागपूर : बाळासाहेब ठाकरे असताना महाराष्ट्रामध्ये शिवसेना होती. आता ही शिवसेना राहिलेली नाही आहे. ती काँग्रेस (Congress) सेना झाली होती. कोणत्याही शिवसेनेत येवढी धम्मक नाही आहे की मला थांबवू शकेल. मी महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. विदर्भाचा सुपुत्र आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये १५ वर्षांपासून लोक मला निवडून देत आहे. यामुळे मला थांबवण्याची ताकद कुणामध्ये नाही आहे, असे आमदार रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

दिल्लीतील पटियाला कोर्टातून ट्रांझिक बेल घेतल्यानंतर गुरुवारी (ता. २४) नागपुरात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांना २८ तारखेपर्यंत बेल मिळालेली आहे. मी अमरावतीत नसतानाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्याविरोधात ३०७ सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), पालकमंत्री यशोमती ठाकूर व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या यांच्या दबावात झाले, असे आमदार रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

MLA Ravi Rana
नववधूचा लग्नाचा आनंद ठरला क्षणिक; पामलवाड कुटुंबायांनी गमावले दोन्ही अपत्य

महाविकास आघाडी (mahavikas aaghadi) खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत आहे. आमदारासोबत अस घडत असेल तर सामान्य जनतेचे काय? महाविकास आघाडीच्या नेत्यांना याचा जबाब द्यावा लागेल. दिल्लीत असताना माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करतात ही माझी फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असेही आमदार रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा १,२०० कोटींचा घोटाळा उघडकीस येईल. ईडी त्याचा तपास करीत आहे. या सरकारचे अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील. त्यांच्या फाईल तयार आहेत, असेही आमदार रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

MLA Ravi Rana
संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या

लवकरच घोटाळा उघडकीस येईल

गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिकनंतर परिवहन मंत्री अनिल परब आणि महिला व बालकल्याण मंत्री तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ईडीच्या रडारवर असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला. अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला अनेक मंत्री तसेच राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यासुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. ठाकूर यांच्या खात्यातील १,२०० कोटींचा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. लवकरच हा घोटाळा उघडकीस येईल आणि कारवाई होईल, असा दावाही राणा यांनी केला.

एकही शिवसैनिक फिरकला नाही

दोनच दिवसांपूर्वी रवी राण यांच्या विरोधात शिवसैनिकांनी विमानतळावर घोषणाबाजी केली होती. राणा यांना नागपूरमध्ये पाय ठेऊ दिला जाणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. मात्र, आज त्यांचा विरोध करण्यासाठी एकही शिवसैनिक फिरकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com