Nagpur Municipal Election
sakal
नागपूर - विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या चार महानगरपालिकांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, चारही ठिकाणी उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. चार महानगरपालिकांमध्ये एकूण ९७ प्रभाग असून, ३८४ जागा आहेत. या जागांसाठी तब्बल २ हजार ५७२ उमेदवार रिंगणात आहेत.