त्वरा करा त्वरा! २ सप्टेंबरपासून महानिर्मितीची पदभरती प्रक्रिया

employment-.jpg
employment-.jpg
Updated on

नागपूर : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचेच वृत्त कानी येत असताना महावितरण मात्र भरती प्रक्रीया राबवून नोकरी इच्छुकांना सुखद धक्का देत आहे. तंत्रज्ञ -३ या पदासाठी महानिर्मितीकडून सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे रिक्त पदांची उपलब्ध संख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण विचारात घेऊन उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी नजिकच्या वीज प्रकल्पांच्या ठिकाणी २ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडीसह चंद्रपूर, मुंबई, पोफळी, पुणे, भुसावळ, नाशिक, पारस आणि परळी वीज केंद्राच्या कार्यालयात उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना महानिर्मितीच्या संकेतस्थळावरुन कागदपत्रे तपासणीची नेमकी तारीख, वेळ, संबंधित कार्यालयासंदर्भात माहिती घेता येईल. महानिर्मितीकडून उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर तसेच एसएमएसद्वारे याबाबतची सूचना देण्यात आली आहे. तंत्रज्ञ-३ पदाच्या सुमारे ७१६ उमेदवारांची कोविड-१९ नियमांचे पालन करून कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे.

कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेला अर्ज, त्यांची मूळ कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वसाक्षांकित केलेला एक छायांकित संच, कागदपत्रे पडताळणी अनुषंगाने जमा करण्यासाठी स्वत:जवळ बाळगावा. आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे घेऊनच उमेदवाराने तपासणीसाठी नेमून दिलेल्या दिवशी व वेळेवर उपस्थित रहावे. सोबत शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे एमबीबीएस डॉक्टरकडून प्रमाणित केल्याचे मूळ फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

सविस्तर वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

कागदपत्रे जमा केल्यानंतर उमेदवाराला संबंधित कार्यालयामार्फत पोच देण्यात येईल. नमूद दिनांक व वेळेत कागदपत्रे जमा करण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दखल घेतली जाणार नसल्याचे महानिर्मितीतर्फे कळविण्यात आले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com