नोंदणी व मुद्रांक शुल्क पदभरतीला विभागाचाच खोडा

सेवा प्रवेश नियम बनविण्यास टाळाटाळ
नोंदणी व मुद्रांक शुल्क पदभरतीला विभागाचाच खोडा
नोंदणी व मुद्रांक शुल्क पदभरतीला विभागाचाच खोडाsakal
Updated on

नागपूर : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. या पदाच्या भरती राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, याच विभागाद्वारे अद्यापी त्यासाठी आवश्‍यक असलेले सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी टाळाटाळ केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे २०२३ पर्यंतच्या राज्य लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेच्या वेळापत्रकात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे. गेल्या २५ वर्षांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात रिक्त पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. काही दिवसांपूर्वी विभागातील पदांबाबत माहिती समोर आली.

नोंदणी व मुद्रांक शुल्क पदभरतीला विभागाचाच खोडा
‘नाना पटोलेंचे मंत्रीसुद्धा ऐकत नाही; ते हतबल प्रदेशाध्यक्ष’

त्यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-१) आणि मुद्रांक निरीक्षक या (गट ब)(अराजपत्रित) पदामधील ३९३ जागा तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक (गट क) या पदाच्या ३९६ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली. यापूर्वी ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येत होती. मात्र, त्यात होणाऱ्या घोळामुळे विद्यार्थ्यांनी ही पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याची मागणी केली. ती मागणी मान्य करीत, सर्व पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी राज्य सरकारला सेवा नियम तयार करण्याची गरज असते. हे नियम तयार करण्याची जबाबदारी भागाची असते. मात्र, विभागातील अधिकाऱ्यांद्वारे त्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप पदभर्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

नोंदणी व मुद्रांक शुल्क पदभरतीला विभागाचाच खोडा
पक्षकारांनी सुसंवादाने प्रकरणे मिटवावीत

लांबणीवर पडण्याची शक्यता

नोंदणी व मुद्रांक शुल्क पदांच्या भरतीसाठी सेवा नियम नसल्याने राज्याच्या लोकसेवा आयोगाद्वारे २०२३ पर्यंतच्या वेळापत्रकात या पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या पदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षापासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पदभरतीसाठी कुठलीच परीक्षा घेण्यात आली नाही. मात्र, विद्यार्थी या परीक्षांसाठी जाहिरात येईल या आशेपोटी सातत्याने अभ्यास करतात. त्यामुळे या पदाच्या भरतीकडे राज्य सरकारने लक्ष देण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com