esakal | साईबाबा पावले रे! या शहरासाठी गुरुवार ठरला 'निगेटिव्ह'
sakal

बोलून बातमी शोधा

Relief as no corona patient was found in Nagpur on Thursday

सात दिवसांतील ही आकडेवारी प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली. यामुुळे शहरात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, आठवडाभरानंतर पुन्हा गुरुवारी एकही कोरोनाबाधित आढळला नाही. ही समाधानकारक बाब आहे. 

साईबाबा पावले रे! या शहरासाठी गुरुवार ठरला 'निगेटिव्ह'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूने मागील आठवड्यात कहर केला आहे. सात दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत होते. मात्र, गुरुवारी (ता. 23) कोरोनाचा एकही बाधित आढळला नाही. एकाही बाधिताची नोंद झाली नसल्यामुळे दिवस दिलासा देणारा ठरला. मेयो मेडिकलमध्ये सुमारे 82 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मेयो रुग्णालयात 40 तर मेडिकलमध्ये 42 जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, एक कोरोनाबाधित मिसिंग असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

शहरात 11 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. 11 मार्च ते 22 एप्रिल दरम्यान 98 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आठवडाभरापूर्वी 15 एप्रिल रोजी एकही कोरोनाबाधित उपराजधानीत आढळला नव्हता. यानंतर तब्बल आठ दिवसानंतर गुरुवारी, 23 एप्रिल रोजी एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, 16 ते 22 एप्रिल या आठवडाभरात कोरोनाच्या 42 रुग्णांची नोंद झाली होती. सात दिवसांतील ही आकडेवारी प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली. यामुुळे शहरात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, आठवडाभरानंतर पुन्हा गुरुवारी एकही कोरोनाबाधित आढळला नाही. ही समाधानकारक बाब आहे. 

जाणून घ्या - Video : साहेबऽऽ, लोक पैसे देतात अन्‌ पूर्ण शरीराशी खेळतात, आज मात्र...

अरोग्य विभागाच्या नोंदीनुसार नागपुरात 16 एप्रिल रोजी 2 तर 17 एप्रिलला 1 जण बाधित आढळला होता. तर 18 एप्रिलला 4 आणि 19 एप्रिलरोजी 10 जण आढळले होते. 20 एप्रिलला 7 तर 21 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांचा उच्चांक ठरला होता. या दिवशी 14 जण आढळून आले होते. तर 22 एप्रिलला 4 जण आढळले. 23 एप्रिल रोजी पुन्हा उसंत मिळाली. एकूण 98 रुग्णांची नोंद झाली असून, 15 जण कोरोनामुक्त झाले तर मेयो मेडिकलमध्ये 82 जणांवर उपचार सुरू आहेत. यामुळे एक कोरोनाबाधित मिसिंग असल्याचे दिसून येते. 

'नीरी'त कोरोनाची तपासणी

शहरातील "नीरी' या संशोधन संस्थेत लवकरच कोरोना चाचणी सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे शहरातील कोरोना तपासणीच्या प्रयोगशाळांची 5 होणार आहे. सद्या मेयो, मेडिकल, एम्स आणि पशू व मत्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) येथील चार प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचणीची सोय आहे. माफसूवर वर्धा, तर एम्सवर पश्‍चिम विदर्भातील अमरावती व यवतमाळचा भार आहे. मेयोमध्ये नागपूर शहर ग्रामीणचा भार आहे. मेडिकलमध्ये नागपूरसह गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील नमुने तपासले जातात. त्यानंतरही एम्समध्ये अधून-मधून नागपूरचे नमूने पाठवले जातात. चारही प्रयोगशाळांमध्ये सद्या अडिचशे ते तीनशे नमुने तपासले जातात. आता "नीरी' संस्थेत नमुने तपासणीचे प्रात्याक्षिक सुरू झाले आहे.

loading image