
नागपूर : एका विशिष्ट धर्माचे विद्यार्थी असल्याचे कारण देत, त्यांना प्रवेश नाकारण्यासाठी संस्थेच्या सचिवांनी सूचना केल्याबाबतची तक्रार खुद्द कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी दिली. यामुळे सचिव आणि प्रवेश समितीतील दोन शिक्षिकांवर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्याकडे तक्रार आली होती.