

Digital Arrest and Cyber Frauds
esakal
नागपूर - ‘तुमच्या नावाने सिमकार्ड आणि बँक खात्यांचा गैरवापर झाला असून तुम्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संशयित आहात’ अशी भीती दाखवत एका ६५ वर्षीय निवृत्त अभियंत्याला तब्बल महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारातून सायबर चोरट्यांनी तब्बल ८६ लाख ९० हजार ४७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी नागपूर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.