

नागपूर : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाने हल्ल्याचा कट रचला. मात्र, पोलिसांचे धागेदोरे त्याच्या पर्यंत पोहोचताच त्याची धडकी भरली. राजाराम पांढुरंग ढोरे (६२) रा. मानकापूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. यासोबतच हल्ला करणारे अब्दुल वसीम (४१) रा. छावणी, अनिल चोरे (३२), अनिकेत ऊर्फ निक्की बहादुरे (२७) दोन्ही रा. मेकोसाबाग आणि अभय (२०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर सुरेश सोनटक्के (६५) नवीन मानकापूर असे जखमीचे नाव आहे.