वेलतूर : नवीन नशेच्या प्रवृत्तीने ग्रामीण भागात चिंता वाढवली आहे. खोकल्याच्या औषधांमध्ये असलेल्या कोडीन घटकाचा गैरवापर करून तरुण नशा करत आहे. ज्यामुळे सामाजिक आजारपण फोफावण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक केली जात आहे..नशा प्रतिबंधक पथकाने अनेक कडक पाऊले उचलली असून, औषधांच्या दुकानांवर नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवर निर्बंध आणले आहेत. मात्र, काही व्यसनींना सहज उपलब्ध होणाऱ्या खोकल्याच्या औषधांचा गैरवापर सुरू ठेवला आहे. या औषधांमधील कोडीन घटकामुळे नशा होते आणि ते स्वस्त असल्याने या औषधांचा वापर वाढत आहे..शाळा-कॉलेजातील तरुणवर्गही या नशेच्या दलदलात सापडल्याचे आढळून येत असून, खोकल्याच्या औषधांचा वापर नशा आणणाऱ्या पदार्थांप्रमाणे होतो आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे..केमिस्टकडील माहितीप्रमाणे, खोकल्याच्या औषधांची विक्री वाढली असून, काही दुकानदार सतर्क झाले आहेत. सातत्याने औषध खरेदी करणाऱ्यांना हे औषध नशा करण्यासाठी वापरत असल्याचे ओळखले जात आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे..व्यसनाधीन तरुण समाजासाठी धोकादायकतरुण पिढी आपल्या देशाचा पाया आहे. त्यांना व्यसनापासून वाचवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी अधिक लक्ष द्यावे. व्यसनाधीन तरुण समाजासाठी मोठा धोका आहे..Nagpur News : वन्यजीवांपासून पिकांचे रक्षण; शेतकऱ्यांना सौर ऊर्जा झटका मशीन वाटप.नशा प्रतिबंधासाठी मेडिकल दुकानदारांनी केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच औषधे विकायला हवीत, तर पालकांनीही आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वय १६ ते ३० या वयोगटात व्यसनाधीनता वाढत आहे. व्यसनमुक्त समाजासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.-शीतल कांबळे, समुपदेशक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.