Nagpur : प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा; मोहन भागवतांचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RSS Chief Mohan Bhagwat

'पूर्वी झालेल्या त्या चुका मान्य करायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत.'

Nagpur : प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा; मोहन भागवतांचं मोठं विधान

नागपूर : आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जातिव्यवस्थेवर मोठं भाष्य केलंय. वर्ण आणि जातिव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या विसरल्या पाहिजेत, असं भागवतांनी म्हटलंय.

शुक्रवारी नागपुरात (Nagpur) एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत म्हणाले, 'जातिव्यवस्थेला आता काही महत्त्व राहिलं नाही. वर्ण, जात या संकल्पना पूर्णपणे सोडून दिल्या पाहिजेत.' डॉ. मदन कुलकर्णी आणि डॉ. रेणुका बोकारे यांनी लिहिलेल्या 'वज्रसूची तुंक' या पुस्तकाचा दाखला देत संघप्रमुख भागवत पुढं म्हणाले, सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता; पण आता तो विसरला गेलाय. मात्र, त्याचे घातक परिणाम आपल्याला पहायला मिळत आहेत. मागच्या पिढ्यांनी सर्वत्र चुका केल्या आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: Ram Temple : अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी अपडेट समोर; CM योगींनी दिली महत्वाची माहिती

पूर्वी झालेल्या त्या चुका मान्य करायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत. त्यामुळं वर्ण आणि जातिव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या विसरायलाच हव्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आरएसएसच्या मुख्यालयात विजयादशमीच्या निमित्तानं भागवत म्हणाले होते की, 'आपल्या मित्रांमध्ये सर्व जाती आणि आर्थिक गटांचे लोक असावेत, जेणेकरून समाजात अधिक समानता आणता येईल.'

हेही वाचा: Railway : मोदींनी उद्घाटन केलेल्या 'एक्सप्रेस'ला म्हशींची धडक; म्हशींच्या मालकाविरुध्द गुन्हा