राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सदावर्तेंना दसरा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gunaratna Sadavarte

दसऱ्यानिमित्त नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने एसटी संपाचे नेते अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सदावर्तेंना दसरा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण!

नागपूर - दसऱ्यानिमित्त नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने एसटी संपाचे नेते अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. सदावर्ते यांनी केलेल्या नथूराम गोडसे यांच्या कौतुकानंतर मेळाव्यात त्यांना का बोलावले ? असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे उद्याच्या नागपूरमधल्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांची, 'एसटी कष्टकरी जनसंघ ' या नावाची संघटना आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका करून; गांधीजींचे मारेकरी नथूराम गोडसे यांचे कौतुक केले होते. 'गांधावादी राजकारण्यांकडून देशामध्ये मोठा कट रचला जात आहे', असे विधानही त्यानी आधी केले आहे. त्याचप्रमाणे भाजपातील नेत्यांशी त्यांची जवळीक असल्याचे बोलले जात आहे.

नागपूरमधील 'रेशीम बाग मैदान' येथे हा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. त्याचप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांकडून विविध व्यायामांचे प्रात्याक्षिक होणार आहे. दरवर्षीप्रमाणे शिस्तबद्ध पद्घतीने हा दसरा मेळावा पार पडणार आहे.