Mohan Bhagwat: मणिपूरला प्राधान्य देणे आवश्यक, काहींच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ; भागवतांचा मोदींवर निशाणा?

Mohan Bhagwat's Attack At PM Modi?: निवडणूक प्रचारा दरम्यान होणाऱ्या भाषणांची पातळी घसरलेली होती, असं ते म्हणाले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwat

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. निवडणुकीदरम्यान सर्व मर्यादा पार करण्यात आल्या. तसेच निवडणूक प्रचारा दरम्यान होणाऱ्या भाषणांची पातळी घसरलेली होती, असं ते म्हणाले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

संघाला विनाकारण काही प्रकरणामध्ये ओढण्यात आलं, तसेच काही लोकांच्या भाषणामुळे समाजामध्ये तेढ निर्माण झालं असं मोहन भागवत म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संघ नाराज असल्याची चर्चा काही दिवसापासून सुरू आहे. त्यातच मोहन भागवत यांनी नेत्यांचे कान टोचले असल्याने त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु आहे.

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat : राजकीय चर्चा थांबवा; प्रश्नांकडे लक्ष द्या; मोहन भागवत यांनी टोचले नेत्यांचे कान

सर्वानुमते आणि लोकांना सोबत घेऊन काम करणे ही भारताची पंरपरा राहिली आहे. निवडणुकीदरम्यान स्पर्धा नक्कीच आवश्यक आहे, पण यावेळी सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. दोन्ही पक्षांकडून असं कृत्य झालं आहे, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं. पण, त्यांचा रोख पंतप्रधान मोदींकडे असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून होत आहे.

Mohan Bhagwat
Shubhangi Gokhale & Mohan Gokhale : पहिल्याच भेटीत केलं प्रपोज ; मोहन-शुभांगी यांची सुंदर प्रेमाची गोष्ट

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणावर विरोधकांनी टीका केली होती. मोदींनी मंगळसूत्र, घुसखोर, जास्त मुलं असणारे असा शब्दांचा वापर एका समाजाला लक्ष्य करण्यासाठी केला होता. यावरुन विरोधकांनी मोदींना चांगलेच धारेवर धरले होते. आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर भागवत यांनी मोदींना सुनावलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मोहन भागवत यांनी यावेळी मणिपूरबाबत देखील भाष्य केलं. मणिपूर एक वर्षांपासून अशांत आहे. मणिपूरबाबत प्राधान्याने विचार करायला हवे.आजही मणिपूर जळत आहे असं ते म्हणालेत. मणिपूरकडे मोदी सरकारचे लक्ष जावे यासाठी त्यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com