RTE Admissions : आरटीई प्रवेश दुसऱ्याच दिवशी अर्जसंख्या अडीच हजारांवर; जिल्ह्यात ६४६ शाळांमध्ये ७ हजार ५ जागा राखीव
Online Registration : नागपूर शहरात आरटीईच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणीच्या दुसऱ्या दिवशीच ६४६ शाळांमध्ये २,७८३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. अर्ज प्रक्रिया २७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
नागपूर : शहरात शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली. नोंदणीच्या दुसऱ्याच दिवशी ६४६ शाळांसाठी २ हजार ७८३ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.