

Nagpur University Professor Recruitment
sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५८ मंजूर प्राध्यापक पदे आहेत. त्यापैकी फक्त ८६ पदावरील प्राध्यापकांवर विद्यापीठाची धुरा असल्याचे सध्याचे चित्र असून एकूण १७२ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या परिस्थितीचा विद्यापीठाच्या शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.