Fire Accident,: रुहाटिया स्पिनिंग मिलला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान, कापसाच्या रुईच्या गठाणींसह यंत्रसामग्री जळून खाक; मिलची भिंत कोसळली, जीवितहानी टळली

Spinning Mill Fire: बार्शीटाकळी तालुक्यातील रुहाटिया स्पिनिंग मिलला भीषण आग लागून कापसाच्या गठाणी आणि यंत्रसामग्री जळाली. कोट्यवधींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Firefighters battle a major blaze at Ruhatia Spinning Mill in Barshitakli.

Firefighters battle a major blaze at Ruhatia Spinning Mill in Barshitakli.

esakal

Updated on: 

बार्शीटाकळी, : तालुक्यातील कान्हेरी सरप परिसरात असलेल्या रुहाटिया स्पिनिंग मिलला शनिवारी (ता.२८) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने मिलमधील कापसाच्या रुईच्या गठाणी, मोठमोठ्या यंत्रसामग्रीसह मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की, मिलची भिंतसुद्धा कोसळली. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...