गरिबीवर मात करीत दोहतरे करतेय स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!

गरिबीवर मात करीत दोहतरे करतेय स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!

नागपूर : खेळाडू जिद्दी व मेहनती असेल तर त्याच्या मार्गात गरिबी अडथळा ठरू शकत नाही. राष्ट्रीय दर्जाची युवा महिला धावपटू रिया दोहतरेने ते सिद्ध करून दाखविले. रियाने दोन वर्षांत अनेक स्पर्धा गाजवून गुणवत्ता सिद्ध केली. स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग करणाऱ्या रियाची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून, त्या दिशेने सध्या तिची झपाट्याने वाटचाल सुरू आहे.

ॲथलेटिक्समध्ये बहुतांश खेळाडू गरीब व मध्यमवर्गीय घरातील आहेत. रियाही याला अपवाद ठरली नाही. रियाला लहानपणापासूनच रनिंगची आवड होती. त्यामुळे याच खेळात करिअर करण्याचा निर्णय घेत ती पहिल्यांदा मैदानावर उतरली. तीन वर्षांपूर्वी रनिंगला सुरुवात केल्यानंतर अल्पावधीतच तिने आपली छाप सोडली. स्थानिक स्पर्धा गाजविल्यानंतर पुढे राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने झेप घेतली.

गरिबीवर मात करीत दोहतरे करतेय स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!
टेकडी गणेश मंदिर : राजे भोसले यांनी केले बांधकाम!

अनेक स्पर्धा व मेडल्स जिंकले. खरबी (वाठोडा) येथे राहणारी रियाही सध्या गरिबीचा सामना करीत आहे. तिच्या वडिलांचा (राजेश) अपघात झाल्यानंतर कुटुंबाचा सर्व भार आई अनितावर आला. त्यामुळे घर चालविण्यासाठी अनिताला बुटिकमध्ये काम करावे लागत आहे. या कमाईतही संसार चालविताना कसरत होत असल्याने राजेशही घरीच कपडे प्रेसचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. आर्थिक चणचण असूनही आईवडिलांनी रियाचे क्रीडाप्रेम जपले. शिवाय मोठ्या मुलीलाही उच्च शिक्षण देत आहेत.

ॲथलेटिक्समध्ये स्टॅमिना खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी हेल्दी डायट घेणे आवश्यक असते. मात्र, पैशाच्या अडचणीमुळे रिया सकस आहार घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा कामगिरीही प्रभावित होते. तिची हलाखीची परिस्थिती पाहून ट्रॅकस्टार क्लबचे प्रशिक्षक रवींद्र टोंग, चक्रपाणी महाविद्यालयाचे डॉ. दिलीप तभानेंसह अनेकांनी मदतीचा हात देऊन तिच्या स्वप्नांना पाठबळ दिले आहे.

गरिबीवर मात करीत दोहतरे करतेय स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!
पोहायला आला अन् दगडावर पडल्याने जीव गमावला

प्रॅक्टिससाठी सायकलने पायपीट

गरिबीचे चटके सहन करीत असलेल्या रियाला सरावाच्या निमित्ताने दररोज खरबी ते रेशीमबाग मैदान सायकलने सहा ते आठ किमी पायपीट करावी लागते. जाण्यायेण्याने ती थकून जाते. कोरोनाकाळातही तिने खेळावरील फोकस कमी होऊ दिला नाही. कधीकधी प्रॅक्टिस मानकापूर किंवा विद्यापीठ मैदानावर राहात असल्याने मैत्रिणीलाही अनेकवेळा लिफ्ट मागावी लागत असल्याचे रियाने मोठया मनाने कबूल केले.

आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर पूर्णपणे समाधानी नाही. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशी माझ्यासह आईवडिलांचीही इच्छा आहे. त्याच उद्देशपूर्तीसाठी सध्या मी कसून मेहनत घेत आहे.
- रिया दोहतरे, राष्ट्रीय महिला धावपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com