
साळवा : साडेचार हजार रुपयांची लाच घेताना महिला पटवाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. प्रज्ञा दयाराम माटे (वय ३४, शांतीनगर घाट, संजय गांधीनगर) असे लाच घेणाऱ्या महिला तलाठ्याचे नाव आहे. ही कारवाई आरोपीच्या राहत्या घरी करण्यात आली. आरोपी महिला कुही तहसील येथील ससेगाव हलक्याअंतर्गत पटवारी पदावर कार्यरत आहे.