

Sambhaji Maharaj Literature Conference, Ramtek, Nagpur
esakal
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १८ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पवित्र रामटेक भूमीत अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा म्हणूनच जगविख्यात नसून ते एक प्रगल्भ 'बहुभाषिक विद्वान आणि महान पंडित' होते. महाराजांची हीच अलौकिक ज्ञानप्रतिभा आणि साहित्यिक ओळख जगासमोर प्रभावीपणे यावी, या मुख्य उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.