Samruddhi Expressway: ट्रकला आग लागून चालकाचा जळून मृत्यू; पुलाखाली पडल्याने दुसऱ्याचा अंत

Samruddhi Mahamarg Accident, Truck Fire, Two Deaths या घटनेत अमरावती जिल्ह्यातील जवळा धोत्रा गावाजवळ ट्रकचा पुढील टायर फुटून भीषण अपघात झाला. क्रॉस बॅरियरला धडकल्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने ट्रकला आग लागली.
Two People Die After a Truck Catches Fire in an Accident on Samruddhi Mahamarg

Two People Die After a Truck Catches Fire in an Accident on Samruddhi Mahamarg

esakal

Updated on: 

धामणगावरेल्वे, : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, सोमवारी पहाटे जवळा धोत्रा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

धावत्या ट्रकचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रक क्रॉस बॅरियरला धडकून घासत गेल्याने डिझेल टाकी फुटली आणि वाहनाने पेट घेतला. या दुर्घटनेत चालकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तर ट्रकमधील दुसरा व्यक्ती पुलाखाली पडल्याने दगावला. दरम्यान, प्रसंगावधान राखत क्लीनरने ट्रकमधून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com