Sana Khan Case : सनासोबत पप्पू चालवायचा ‘सेक्स्टॉर्शन’ रॅकेट; अनेकांची कोट्यवधींची केली लुबाडणूक

भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या खुनात नवीच माहिती आली समोर.
Sana Khan Murder Case
Sana Khan Murder Casesakal

नागपूर - भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या खुनात नवीच माहिती समोर आली आहे. सना खान यांच्या (वय ३४) माध्यमातून पप्पू उर्फ अमित शाहू हा ‘सेक्सटोर्शनचे रॅकेट’ चालवित असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याने या माध्यमातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या व्यक्तींची कोट्यवधींनी लुबाडणूक केली.

सना खान आणि पप्पू शाहू यांची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली. यानंतर वाराणसीला जात असताना, त्याने सना खान यांना जबलपूर येथून बिर्याणीचा डबा दिला होता. तेव्हापासून त्याची आणि सना खान यांची पक्की मैत्री आणि प्रेमात रुपांतर झाले.

यानंतर जबलपूरनजिकच्या कटंगी येथे आशीर्वाद ढाबा सुरू करण्यासाठी सना खान यांनी पप्पू शाहूशी व्यावसायिक भागीदारी सुरू केली. सना आणि पप्पू एकमेकांच्या खूप जवळ आले.

त्यातून एप्रिल महिन्यात दोघेही विवाहबंधनात अडकले. यानंतर पप्पू शाहू याला सना हिचे अनेकांसोबत व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली. त्याने ते व्हिडीओ आणि फोटो आपल्याकडे ठेवले. या व्हिडीओमध्ये नागपूरसह उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील काही राजकीय पदाधिकारी आणि बड्या आसामींचा समावेश असल्याचे त्याला दिसून आले.

त्यामुळे पप्पूने सना खान यांना या व्हिडीओचा वापर करीत, त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यासाठी दबाव टाकला. त्यातून सना खान यांनी अनेकांची कोट्यवधीनी लुबाडणूक केली. सना खान या गॅंगशी मार्च २०२१ मध्ये जुळल्या गेली होती.

या रॅकेटच्या माध्यमातून शाहूने मोठी संपत्ती जमवली होती. दरम्यान या संपत्तीतील पैसे सातत्याने सना खान मागत असल्याने तिला कायमचे संपविण्याच्या उद्देशातून त्याने तिचा खून केला. या प्रकरणात शाहू याच्या विरुद्ध ३८४, ३८६, ३८९, ३५४ (ड), १२० (ब) आणि ३४ कलमाअंतर्गत व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (इ), ६७, ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी करायचे फसवणूक

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकारात नेमके कोणाला ओढायचे हे पप्पू त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहून ठरवत असे. त्यानंतर सानाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीसोबतचे अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळाल्यानंतर साहू व त्याच्या गँगमधील सदस्य पीडीत व्यक्तीला फोन करून पैशाची मागणी करत असे. सीताबर्डीतील एका व्यापाऱ्याने लाखो रुपये या गँगला दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com