esakal | एक मात्र खरं, डॉक्टरांच्या मनाला संजय राऊत यांचे वक्तव्य बोचले, कोण म्हणाल असं...
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut's statement shocked the doctors

जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेली माणसेच आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स असले तरी मी स्वतः कधी डॉक्टरांकडून औषधे घेत नाही. मी कम्पाऊंडरकडून औषधे घेतो, असे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला.

एक मात्र खरं, डॉक्टरांच्या मनाला संजय राऊत यांचे वक्तव्य बोचले, कोण म्हणाल असं...

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : आमचे डॉक्टर्स खूप मेहनत करीत आहेत. आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस लोकांची सेवा करीत आहेत. डॉक्टरांच्या मनाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य बोचले आहे. राज्य आज ज्या परिस्थितीतून जात आहे, अशा स्थितीत कुठलेही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीत यांनी दिला.

उपराजधानीतील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आले असताना फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते जे काही वक्तव्य आहे. ते कुठल्या मुडमध्ये त्यांनी केले, याची कल्पना मला नाही. पण असं बोलणं योग्य नाही. डॉक्टरांच्या मनाला राऊत यांचे वक्तव्य बोचलेले आहे. राज्य आज ज्या परिस्थितीतून जात आहे, अशा स्थितीत काहीच गंभीर नसलेले वक्तव्य करणे कदापिही योग्य नाही. कुणाबद्दलही बोलताना विचारपूर्वक बोलले पाहिजे. जेणेकरून त्यांच्या भावना दुखावल्या जायला नको.

जाणून घ्या - सतरा महिन्यांत सरपंच झाला नायक!

‘मी स्वतः कधी डॉक्टरांकडून औषधे घेत नाही, मी कम्पाऊंडरकडून घेतो', असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच केले. यावरून सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले. विविध स्तरांवरून राऊतांची खिल्ली उडवली जात आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी जागतिक आरोग्य संघटनेचीही अक्कल काढली होती.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेली माणसेच आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स असले तरी मी स्वतः कधी डॉक्टरांकडून औषधे घेत नाही. मी कम्पाऊंडरकडून औषधे घेतो, असे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनीही खासदार राऊत यांचे हे बोलणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली.

अधिक वाचा -  मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या या खासदाराचे भाजपमध्ये गेलेल्यांच्या घरवापसीबद्दल मोठे व्यक्तव्य.. म्हणाले...

कोरोनासंदर्भात आयुक्त संजीव कुमार यांच्याशी चर्चा

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केल्याचे भाजपवर यापूर्वीहीसुद्धा आरोप झाले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत याचा भाजपला फायदा झाल्याचे अनेकांनी मान्यही केले आहे. फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोनासंदर्भात आयुक्त संजीव कुमार यांच्याशी चर्चा केली. माध्यमांनी याबाबत फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर जास्त भाष्य करण्याचे टाळले.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image