
नागपूर : बीडमधील केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख याची हत्या ही राजकीय हत्या आहे. त्यातील आरोपी वाल्मिकी कराड याच्यावर कोणत्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्त आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तो राजकीय 'आका' आपल्या मंत्रिमंडळात असून त्याला बाहेर काढा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. १०१ कलमानव्ये अल्पकालीन चर्चे दरम्यान ते बोलत होते.